logo

भिवंडीच्या जागेवर काँग्रेसचाच दावा; राष्ट्रवादीने आग्रह सोडावा - दयानंद चोरघे


बदलापूरः भिवंडी लोकसभा मतदार संघावरील जागेचा आग्रह राष्ट्रवादीच्या शरदचन्द्र पवार गटाने सोडावा. ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद अधिक ती जागा त्या पक्षाला मिळावी, अशा पद्धतीने महाविकास आघाडीचे जागावाटप होणे अपेक्षित आहे, त्यामुळे भिवंडीची जागा काँग्रेसकडे राहणेच योग्य असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केले.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात भिवंडी लोकसभेच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून आठवड्याच्या अखेरपर्यंत हा निर्णय होणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी दिली आहे.

मंगळवारी बदलापूर दौऱ्यावर आलेल्या दयानंद चोरघे यांनी काँग्रेसच्या बदलापूर शहर कार्यालयात भिवंडी लोकसभेच्या जागेच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी शहराध्यक्ष संजय जाधव यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे नेते सध्या पहिल्या टप्प्यातील जागांच्या निर्णय प्रक्रियेत असून भिवंडी जागेबाबत या आठवड्याअखेरपर्यंत निर्णय होणे अपेक्षित असल्याचे श्री. चोरघे यांनी सांगितले. त्याचबरोबर सध्या काही मंडळींकडून उमेदवारी आपल्यालाच जाहीर होणार असल्याबाबत करण्यात येत असलेली वक्तव्ये तथ्यहीन असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

0
0 views